नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू
मंचर (प्रकाश इगवे) : चारचाकीचा आरसा डोक्याला लागल्याने नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील लोणी मंचर रस्त्यावर घडली. या अपघातात तनिष्का नवनाथ ढोबळे (वय ९, रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव) या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी नवनाथ महादू ढोबळे यांनी फिर्याद दिली. वाहनचालक शरद बन्सी थोरवे (रा. शिरोली बुद्रुक, ता. जुन्नर) याच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ढोबळे यांची मुलगी तनिष्का जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोबळेवाडी येथून पिकअपमधून बसून दुपारी तीनच्या दरम्यान घरी येत होती. घराजवळ उतरल्यानंतर घराकडे येण्यासाठी रस्ता ओलांडताना मोटारीचा आरसा तिच्या डोक्यात जोरात लागला.
