दयानंद कला महाविद्यालयाच्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी केले वृक्षारोपण

दयानंद कला महाविद्यालयाच्या रा.से.यो. स्वयंसेवकांनी केले वृक्षारोपण

लातूर (प्रतिनिधी) : उठें समाज के लिए उठें।। जगें स्वराष्ट्र के लिए जगें।। स्वयं सजे वसुंधरा संवार दें.।।.. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या लक्ष गीताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून आणि भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छेने वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. (26 जानेवारी 2022 रोजी) राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी 18 वृक्षांची रोपे लावून या मोहिमेची सुरुवात केली असून 75 रोपे लावण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमे अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी 75 वृक्ष लावून त्या वृक्षांचा वर्षभर सांभाळ करायचा असा निर्धार करून या मोहिमेचे यशस्वी वाटचाल चालू आहे. भरत पवार, तय्यब सय्यद,आदित्य आकनगिरे, सौरभ पतंगे, ऐश्वर्या पाटील, राधा लोंढे, निकिता गोटके, सुप्रिया ठोंबरे, प्रणिता जाधव या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून यशस्वी कार्य केला आहे. त्याबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी. गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुभाष कदम, डॉ.सुनिता सांगोले, डॉ.मच्छिंद्र खंडागळे, प्रा.विलास कोमवाड, प्रा.सुरेश श्रीसागर, प्रा.महेश जंगापल्ले. इत्यादींनी या सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल बद्दल कौतुक केले आहे.

About The Author