साई येथे मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील साई येथे मानस फाऊंडेशन (एक हात मदतीचा) व हरिश्चंद्र मेडिसिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनीचे औचित्य साधून दि. २६ जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान, आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उदघाटनाप्रसंगी डाॅ. सुदर्शन गुंठे, डाॅ. नितीन बरडे, डाॅ. प्रमोद लोकरे, मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष जीवन पवार, उपाध्यक्ष बापुराव पवार, सचिव संदीप नवटक्के यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मोफत सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात गावातील १७५ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सहसचिव तानाजी पवार, कोषाध्यक्ष सिदाजी पवार, सदस्य सुरेखा पवार, बालाजी पवार, मोरेश्वर वलसे, दयानंद पवार, अमोल श्रीपतराव पवार, अमोल मोतीराम पवार, सुरज पवार यांच्यासह गावतील आदी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.