शेतकऱ्यांच्या मुलांची स्वप्नपूर्ती हे आमचे ध्येय – आ. धिरज देशमुख

शेतकऱ्यांच्या मुलांची स्वप्नपूर्ती हे आमचे ध्येय - आ. धिरज देशमुख

लातूर अर्बन को-ऑप बँके च्या वतीने झाला सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नव्या पिढीला, शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करत-करत उद्योजकही व्हायचं आहे. ड्रोनचा वापर करून त्यांना शेतीत फवारणी करावी वाटते. अशी अनेक स्वप्नं तरुण पिढी पाहत आहे. ही स्वप्नं काय आहेत, हे जाणून घेऊन आम्ही त्यांना बळ देऊ. शेतकऱ्यांच्या मुलांची स्वप्नपूर्ती हे आमचे ध्येय आहे, असा शब्द लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे बोलताना दिला.
ते लातूर अर्बन बँकेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष व आमदार श्री. धिरज देशमुख यांचा लातूर बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप राठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी यावेळी धिरज देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अँड प्रमोद जाधव, बँकेचे कार्यकारी संचालक संचालक हणमंत जाधव, लातूर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. आदिनाथ सांगवे, अर्बन बँकेचे व्यवस्थापक श्री. महेश तापडीया, श्री. समीर राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलीपराव देशमुख साहेब यांनी ४० वर्ष बँकेच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधार दिला

यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले,की माजी मंत्री सहकारमहर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी गेली ४० वर्षे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला. बँक कायम अग्रेसर ठेवली. तसेच काम यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत राहू. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन लातूरच्या अर्थकारणाला गती देण्याचे काम करु. शेतकरी ते बाजारपेठ असे चलन फिरते राहिले तर प्रत्येकाच्या आयुष्यात क्रांती होते असेही ते यावेळी म्हणाले.

लातूरकर कायम विकासाच्या मागे उभे राहतात – आ.धिरज देशमुख
लातूरमधील राजकीय व्यक्तींनी लातूरची संस्कृती, लातूरच्या वातावरणाचा स्तर कधीही खाली जावू दिला नाही. टीका झाली किंवा विरोध झाला तरी तो खेळीमेळीने घेतला जातो. चांगल्या निर्णयाबद्दल एकमेकांचे कौतूकही केले जाते. कारण, शेवटी राजकारण, समाजकारण हे विकासासाठी केले जाते. लातूरकरही कायम विकासाच्या, विकासाचा ध्यास घेतलेल्या व्यक्तीच्याच मागे उभे राहतात. त्यामुळे लातूर पुढे गेले आणि आणखी ते पुढे जात राहील, असा विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.

About The Author