स्वतःच्या मालकीचा फ्लॅट भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक

स्वतःच्या मालकीचा फ्लॅट भासवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी (प्रकाश इगवे) : फ्लॅट आपल्या मालकीचा असल्याचे भासवून साडेतीन लाख रुपये धनादेशाद्वारे घेऊन ते परत न देता फसवणूक केली. पिंपळे गुरव येथे २०२० पासून २८ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गणेश रमेश पोलकमवार (रा. जुना बाजार, खडकी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील युवराज ट्रेडर्स या इमारतीतील फ्लॅट हा आरोपीच्या मालकीचा असल्याचे आरोपीने भासवले. फिर्यादीकडून धनादेशाद्वारे साडेतीन लाख रुपये घेतले. ते परत न देता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author