राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्यामलाल हायस्कूल मध्ये श्रद्धांजली अर्पण !
उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद चोबळे , तसेच मराठी विभाग प्रमुख प्रविण भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा दिना निमित्त भोळे प्रविण , मुक्कावार वनमाला, मा. मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी महात्मा गांधीजी यांच्या जीवनकार्याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले, सत्य, अहिंसा, स्वावलंबन, देशासाठी समर्पण भावना, स्वदेशी खादीचा वापर इ. गुण आपल्या सर्वांच्या आचरणात आले पाहिजेत असे मत व्यक्त केले.वक्तृत्व स्पर्धेत उत्कृष्ट भाषण केलेल्या शिंगडे संचिता, कांडेकर सोनाक्षी, बिरादार मन्मथ या विद्यार्थ्यांनी प्रभाविपणे ऑनलाईन भाषण केले. स्वच्छता, स्वावलंबन,व्यक्तिमत्व विकास, श्रम प्रतिष्ठा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यासंबंधीचे व्हिडिओ सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले. बेद्रे प्रणव व डोंगरे उमेश या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांची वेशभूषा परिधान केली त्या बद्दल मा.मु. अ. आनंद चोबळे यांनी अभिनंदन केले. बेद्रे प्रतीक, भार्गवी शास्त्री या विदयार्थ्यांनी सुंदर असे गांधीजी चे भजन सादर केले.
कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी एक मिनिटाचे मौन पाळून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्री नामदेव हके यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.