वकिलाच्या नावाने बनावट सोशल अकाउंट

वकिलाच्या नावाने बनावट सोशल अकाउंट

पिंपरी (रफिक शेख) : वकिलाच्या नाव व फोटोचा वापर करून इंस्टाग्राम अॅपवरून १७४ अकाउंट उघडून फसवणूक केली. हा प्रकार सांगवी -येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला. रोहन बाळासाहेब जमादार (माळवदकर) (वय २६, रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांनी शुक्रवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षय विलास रोकडे (रा. नंदूरवैद्य, पो. अस्वली, नाशिक) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने ‘फिर्यादीच्या नावाचा व फोटोचा वापर करून इन्स्टाग्राम अॅपवरून १७४ अकाउंट उघडले. तसेच फिर्यादीचा मित्र व मानलेली बहीण यांच्या इन्स्टाग्राम अॅपवरील अकाउंटवर वाईट मेसेज करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत नमूद आहे.

About The Author