शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा – डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

शिक्षणक्षेत्रातील समस्यां सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा - डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण क्षेत्रात आज विविध पातळ्यांवर अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील जाणकारासह कार्यकर्त्यांनी पूढाकार घ्यावा असे अवाहन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले. शहरातील अल ईमान मायनॉरेटी एज्युकेशन सोसायटी च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ते म्हणून बोलत होते.

अध्यक्ष स्थानी हाफिज शेख खुर्शीद साब यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहूणे म्हणून जनआंदोलन नेते सूप्रीयभाऊ बनसोडे प्रा.डाॅ. सय्यद अकबरलाला, प्रा.शादूल्लाखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते संजयभाऊ माळी, सय्यद रब्बानीभाई, खूर्रमखान पठाण,शेख अल्लाउद्दीन शिरूरताजबंद,पत्रकार मेघराज गायकवाड,प्रा.नळेगांवकर आदींची उपस्थिती होती. पूढे बोलताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे माध्यम असून कितीही अडचणी आल्यातरी विद्यार्थ्यांनी अखंडित पणे शिक्षण घेणे गरजेच आहे.तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवर लक्ष केंद्रित करून समाजातील विविध घटकांनी विशेषतः सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांनी यासाठी पूढाकार घ्यावा जेणेकरून देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य या माध्यमातून घडेल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी सूप्रीयभाऊ बनसोडे, संजयभाऊ माळी, प्रा.डाॅ.अकबर लाला,प्रा.शादूल्ला पठाण यांची समायोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे संयोजक शेख अब्दुलासर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे उद्देश सांगून प्रभागातील विविध अडीअडचणी संदर्भात भविष्यात काम करणार असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफीज शेख बिलालसाब यांनी केले तर आभार शेख रब्बानी यांनी मानले.

About The Author