औराद बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी सौ.चंद्रकला भंडारे
औराद शहाजानी (भगवान जाधव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक म्हणून सौ. चंद्रकला मोहनराव भंडारे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. औराद शहाजनी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती नावाजलेली असून, जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथील बाजारपेठेत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीला येतो. बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ आहे. यात राज्य शासनाने मुख्य प्रशासक म्हणून सौ.चंद्रकला मोहनराव भंडारे यांची नियुक्ती केल्याचे पत्र काढण्यात आले आहे. सोमवारी जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी पदभार देण्याचे आदेश बाजार समिती सचिवांना दिले.
या निवडीबद्दल भंडारे यांचे स्वागत फटाके फोडून करण्यात आले. या निवडीमुळे सौ.भंडारे यांचा औराद ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच आरती बालाजी भंडारे, उपसरपंच महेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी धनाजी धनासुरे उपस्थित होते, तसेच शहर काँग्रेसच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मसिंह पाटील, बक्षोद्दीन मुल्ला , असिफ पटेल , बाबुराव भंडारे , डॉ.डी.एस. कदम, प्रगतशील शेतकरी सुभाषराव मुळे, माजी सरपंच मोहनराव भंडारे, सतीश देवणे, बाजार समितीचे सचिव सतीश मरगणे, शहाजान नाईकवाडे, बालाजी भंडारे, जीवन कांबळे रवी गायकवाड दिलीप दापके आदी उपस्थित होते.