भादा पोलिसांची कामगिरी दमदार; ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त
बेलकुंड (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील बेलकुंड येथे चोरीच्या मोटारसायकल विक्री केल्याची माहिती भादा पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहिती च्या आधारे भादा पोलीस स्टेशनचे सपोनी विलास नवले यांच्या पथकाने छापा टाकून ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या असून याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या परिसरातील एका तरुणाने मी एका खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरकडे नौकरी करीत असून माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगून सदरील मोटारसायकलचे कागदपत्रे तुम्हाला आठ दिवसाच्या आत देतो असे सांगून बेलकुंड येथे या मोटारसायकली विक्री केल्या होत्या. सदरील प्रकरणातील तरुण फरार असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर मोटारसायकल चोरीची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागणार आहे. या प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या ६ मोटारसायकलचा पंचनामा करण्यात आला असून या मोटारसायकल बाळगणाऱ्याना सदर मोटारसायकलचे कागदपत्रे हाजर करणे बाबत पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, डीवायएसपी मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भादा पोलीस स्टेशनचे सपोनि विलास नवले, सतीश सारोळे, शिवरूद्र वाडकर, चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत कलमे, महादेव चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
भादा पोलीसांचे जनतेला आवाहन – जनतेने कोणी बिना कागदपत्राच्या मोटरसायकल खरेदी केली असल्यास त्या चोरीच्या असण्याची शक्यता असल्याने तात्काळ पोलीस स्टेशन भादा, येथे संपर्क करून जमा कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.