माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जिल्हा बँकेत अभिवादन

माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जिल्हा बँकेत अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या दिवंगत डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या जयंती निमित्ताने बुधवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी मुख्यालयात बँकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव यांच्या हस्ते डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी बँकेचे संचालक अशोक गोविंदपुरकर, संचालिका सौ स्वयं प्रभा पाटील, संचालक अनुप शेळके, संचालिका सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव उपस्थित होते.

याप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगिले, टी एम जाधव, उपसर व्यवस्थापक बब्रुवान पवार, व्ही. जी शिंदे, विविध विभागाचे खाते प्रमूख अधिकारी ,कर्मचारी , महीला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!