PSG INTERNATIONAL SCHOOL मध्ये बक्षीस वितरण व हळदी कुंकू उत्साहात साजरे

PSG INTERNATIONAL SCHOOL मध्ये बक्षीस वितरण व हळदी कुंकू उत्साहात साजरे

लातूर : मुलाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही Team PSG कायम प्रयत्नशील असतो. ह्यासाठीच स्कूल मध्ये ऑनलाइन पद्धतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. Drawing, Singing, Non fire cooking, Dance, Storytelling , Fancy dress ह्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये Family Day स्पर्धेत क्रिष्णवी नागुरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला तर Singing मध्ये अनघा निटूरकर, अक्षरा देशमुख Dance मध्ये निसा मंत्री आणि ज्ञानेश्वरी शेळके Non fire cooking मध्ये अर्जुन नागुरे, क्रिष्णवी नागुरे आणि मंजिरी देशमुख Story Telling मध्ये अनिश मंत्री, अथर्व पटवारी Drawing मध्ये रिषभ देशमुख, विराज कदम तसेच Fancy dress स्पर्धेमध्ये अनिश मंत्री, दिव्यांक नीलावार आणि निसा मंत्री या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकाविला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पदक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

तसेच शाळेच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. Covid19 चे सर्व नियम पाळून सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला PSG International School चे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन देशमुख सर, संचालिका डॉ. प्रणिता कुलकर्णी पालक व परिसरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेचा स्टाफ गौरी देशमुख, आश्विनी देशमुख, पूजा मंदाडे, अबोली मोरे, पूनम जाधव, सोनिया पाटील, वर्षा गिरी, उमेश बोराडे. वर्षा धानुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About The Author