बेकायदेशिर पिस्टल बाळगने पडले महागात

बेकायदेशिर पिस्टल बाळगने पडले महागात

स्थानिक गुन्हे शाखेकडुन गुन्हेगारास अटक

पुणे (रफिक शेख) : पुणे कार्यक्षेत्रातील गंभीर गुन्ह्याना प्रतिबंध करूण शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार व हद्दपार केलेले गुन्हेगार याना चेक करून तसेच अवैध अग्निशत्र विरोधी विशेष मोहीम राबवुन शत्र बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करने बाबत आदेशित केले होते, गुन्हे शाखा १ पथकातिल पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांच्या बातमीदारा करवी बातमी मिळाली की ८ वर्षापूर्वी पप्पु तावरे रा. जांभळी गांव ता. हवेली जि. पुणे या रेकॉडवरील आरोपीस निळकंठेश्वर पायथ्या जवळ जांभळी गांव येथे रूपेश तावरे माऊली तावरे या गजा मारणे टोळीतील ७ते ८ जणांनी मिळुन टोनीचे वर्चस्वाचे कारना वरूण पिस्टल मधुन गोळ्या झाडुन व कोयत्याने गंभीर मारहाण करून खून केला होता. त्या बाबत हवेली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होता त्यामध्ये सर्व आरोपीना अटक झाली होती त्यामध्ये सर्वजण जामिनावर सुटले होते परंतु माऊली तावरे यास जामिण झाला नव्हता सुमारे १ महिन्या पूर्वी दाखल गुन्ह्यातील आरोपींना निर्दोष सोडल्याने दिनांक २५/१२/२०२१ रोजी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तावरे रा. मु. जांभळी पो. सांगरुण ता. हवेली जि.पुणे यांस येरवडा जेल येथून सोडले होते त्यास विरोधी पार्टीचे सदस्य मर्डर करतील या भितीने स्व संरक्षणार्थ तो पिस्टल सारखे हत्यार जवळ बाळगुण पासोडी धायरी पुणे येथे फिरत आहे अशी खात्री शीर माहीती मिळाल्याने त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शैलेश संखे गुन्हे शाखा युनिट १ पुणे यांना सांगितली त्यांनी ती वरिष्ठाना माहीती देऊन पो. उप.नि. श्री. सुनिल कुलकर्णी व स्टाफ यांना आदेशित केले त्या प्रमाणे पोलीस उप निरिक्षक सुनिल कुलकणी . संजय गायकवाड पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे . अनिकेत बाबर. राहुल मखरे . अशोक माने.शशिकांत दरेकर . विजयसिंह वसावे. रुक्साना नदाफ असे दिनांक २९/०१/२०२२ रोजी पासोडी धायरी याठिकाणी सापळा रचुन रात्री १९/३० वा. शंकर पोकळे याचे मोकळे जागेमध्ये पकडुन त्यास नाव व पत्ता विचारता त्याने अपले नाव ज्ञानेश्वर उर्फ माऊली पांडुरंग तावरे वय ३१ वर्ष रा. मु. जांभळी पो. सांगरूण ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगीतले त्याची स्टाफचे मदतीने पंचा समक्ष अंग झड़ती घेतली असता त्याचे पॅन्ट मध्ये कंबरेस डावे बाजुस खोचलेले किं. रू. ६२०००/- एक लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह मिळुण आले त्याची मॅगझीन काढुण पाहता त्यामध्ये २ जिवंत काडतुसे मिळुण आले. या बाबत पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांनी तक्रार दिलेने नमुद इसमा विरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ४५/२०२२ भारताचा हत्यार कायदा कलम ३(२५) म. पो. का.३७(१)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुमारे ८ वर्षापूर्वी कुख्यात गुंड पप्पु तावरे याचा हवेली पोलीस ठाणे पुणे ग्रामिण हद्दीत खुन झाला होता नमुद अरोपी हा सदर खुन प्रकरणातील आरोपी असुन तो एक महिन्यापूर्वी निर्दोष सुटलेला आहे सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याने सदरचे गावठी पिस्टल हे स्वसंरक्षणार्थ वापरत असल्याचे सांगितल . सदरची कामागिरी मा. पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता मा. पोलीस सह आयुक्त श्री. रविंद्र शिसवे मा. अपर पो. आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्ग दर्शनाखाली युनिट. १ गुन्हे शाखा. पुणे शहराचे वरिष्ठ पोलीस श्री. शैलेश संखे. पोलीस उपनिरिक्षक सुनिल कुलकर्णी . संजय गायकवाड . पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे . अनिकेत बाबर. राहुल मखरे. अशोक माने. शशिकांत दरेकर. विजयसिंह वसावे. रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

About The Author