इंदिरा सहकारी सूतगिरणी च्या चेअरमनपदी बाळासाहेब कदम व्हॉईस चेअरमन धनराज पाटील

इंदिरा सहकारी सूतगिरणी च्या चेअरमनपदी बाळासाहेब कदम व्हॉईस चेअरमन धनराज पाटील

२७ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या इंदिरा सूतगिरणी च्या बिनविरोध निवडीची परंपरा कायम

लातूर (प्रतिनिधी) : मराठवाड्यात सहकारी तत्वावर चालु असलेली लातूर येथील इंदिरा सहकारी सूतगिरणी च्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सहीत १५ संचालक मंडळ बिनविरोध यापुर्वीच निवडून आलेले आहेत मंगळवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी लातूर येथे इंदिरा सहकारी सूतगिरणी कार्यालयात चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली निवडणुक निर्णय अधिकारी एम डी शिंदे यांच्याकडे अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब सुरेश कदम (चिखुरडा) उपाध्यक्ष पदासाठी धनराज चंद्रकांत पाटील (हरंगुळ) यांचे प्रतेकी या पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाले त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी श्री माधव शिंदे यांनी ही या दोघांच्या निवडी बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर केले

तत्पूर्वी सर्व नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन व्हॉईस चेअरमन निवडीचे सर्वाधिकार माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कडे दिले होते त्यात सर्वांनुमते बाळासाहेब कदम चेअरमन व व्हॉईस चेअरमन धनराज पाटील यांची नावे यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जाहिर केले होते. यावेळी इंदिरा सहकारी सूतगिरणी चे नूतन संचालक मंडळ इंदिरा सहकारी सूतगिरणी चे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आबासाहेब पाटील सेलुकर, काशिम मौला शेख, अनिरुद्ध पाटील, रघुनाथ मुळे, विलास देशमुख, महादेव भाडूळे, दिलीप गिरी, महादेव मस्के, संतोष चामले, सौ मंदा जोशी, सौ मीना सूर्यवंशी इंदिरा सूतगिरणीचे कार्यकारी संचालक अतुल पाटील उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन व्हॉईस चेअरमन यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार
नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब कदम व व्हॉईस चेअरमन धनराज पाटील यांचा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, पत्रकार हरीराम कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी कामकाज पाहिले त्यांना श्री गायकवाड यांनी सहकार्य केले यावेळी कार्यकारी संचालक अतुल पाटील, अधिकारी, उपस्थित होते आभार प्रदर्शन नूतन व्हॉईस चेअरमन धनराज पाटील यांनी मांडले.

About The Author