जिल्हा बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज वाटप सुरू

जिल्हा बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज वाटप सुरू

लातूर तालुक्यातील शिराळा शाखेत झाला शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा शब्द दिला होता त्याची पूर्तता करत लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने लातूर तालुक्यातील शिराळा शाखेत शुक्रवारी शेतकरी सभासद याना बिन व्याजी कर्ज देण्याचा शुभारंभ जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव संचालक अँड राजकुमार पाटील यांच्या हस्ते ६१ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले जो शब्द माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिला होता त्या शब्दाची पूर्तता जिल्हा बँकेने केली आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी यांची उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या योजनाचा लाभ घ्यावा – अँड प्रमोद जाधव यांचे आवाहन

यावेळी बोलताना अँड प्रमोद जाधव म्हणाले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री ना अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृ्त्वाखाली लातूर जिल्हा बँकेची वाटचाल सुरू असून शेतकऱ्यांना केंद्रं बिंदू मानून वेळोवेळी शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे त्यानुसार जिल्हा बँकेच्या वतीने शून्य टक्के दराने पिक कर्ज देण्याचा शुभारंभ करण्यात आला असून या माध्यमातुन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव यांनी केले आहे.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता दिली – संचालक राजकुमार पाटील

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठया प्रमाणावर मदत झाली त्यामुळे शेतकरी सभासद समृध्द झाला असून परिसरातील साखर कारखान्याने उसाला योग्य भाव दिल्याने लोकांना मोठया प्रमाणावर मदत झाली आहे बँकेने ही योजना सुरू करून शब्दाची पूर्तता केली असून शेतकऱ्यांनी लाभ घेवून वेळेवर परतफेड करावी असे आवाहन त्यांनी केले.

शिराळा शाखेत ६१ लाख रुपये कर्ज वितरण

यावेळी शिराळा शाखेच्या अंतर्गत प्राथमिक स्वरूपात ६१ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले त्यात शिराळा, भिसेवाघोली, खंडाळा, गोंदेगाव, पिंपरीअंबा येथील शेतकरी सभासद यांचा समावेश आहे यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते सत्तार पटेल, भिसे वाघोली चे चेअरमन संभाजी वायाळ, शिराळा चे चेअरमन दिलीप काळे, खंडाळा चेअरमन शेषराव झाडके, गोंदेगावचे चेअरमन राहुल देशमुख,नाना पालकर, विश्वनाथ शिंदे उपस्थित होते.

प्रास्ताविक भिसेवाघोली सोसायटीचे चेअरमन संभाजी वायाळ यांनी केले कार्यक्रमास तालुका फील्ड ऑफिसर ए, एल. मगर, शाखा व्यवस्थापक प्रमोद आर्विकर, इन्स्पेक्टर माळी शेतकरी सभासद उपस्थित होते.

About The Author