रेणापुरात कॉग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन
शर्म करो…शर्म करो…मोदी सरकार शर्म करो…
रेणापूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळातील आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी व कोरोना मृत्यूची जबाबदारी टाळण्यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्र सरकार कोरोना वाढीस जबाबदार आहे, असे संसदेत खोटे बोलून महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे. यांच्या निषेधार्थ रेणापूर शहर व तालुका कॉग्रेसच्या वतीने दि. ११ फेबुवारी वार शुक्रवार रोजी सकाळी १०.३० वाजता रेणापुर शहरातील गांधी चौकात ‘शर्म करो…शर्म करो…मोदी सरकार शर्म करो…’ घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले.
या अंदोलनात रेणापूर तालुका अध्यक्ष प्रमोद आबा जाधव, सेवा दल जिल्हा अध्यक्ष रमेश सुर्यवंशी, शहर अध्यक्ष मतिनअलि सय्यद, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष पूजा इगे, विद्यार्थी काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब करमुडे, गटनेते पद्मम पाटील, शिवराज सप्ताळ, सेवा दल तालूका अध्यक्ष हनमंत पवार, रामलिंग जोगदंड, प्रदिप राठोड, अनिल पवार, अजय चक्रे, सचिन इगे, प्रदिप काळे यांच्यासह रेणापूर तालुका व शहर कॉंग्रेस, नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्याक सेल, ओ.बी.सी. सेल, NSUI, सोशल मिडिया, इंटक, असंघटीत कामगार सेल, किसान सेल विलासराव देशमुख युवा मंच, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.