‘जिल्हा बँक आपल्या दारी’; नांदगाव येथे निराधारांना घरपोच पगारी चे वाटप
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नुतन संचालक राजकुमार पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन आ. धिरज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘जिल्हा बँक आपल्या दारी’ हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत ग्रामीण भागातील गोर गरीब, कष्टकरी, निराधार, दिव्यांग यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी घरपोच पगारी वाटप करण्याचा निर्णय घेत व त्यांची तातडीने अंमलबजावणी करत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 11 फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने नुतन संचालक राजकुमार पाटील यांचा हस्ते नांदगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे निराधार, दिव्यांगांना पगारी चे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील दिव्यांग, वृद्ध, निराधारांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्याना मोबाईल व्हॅन ए टी एम द्वारे गावातच पगार वाटप करण्यात आली. घरपोच पगारी वाटपाचा निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांग, वृद्ध, निराधार लाभार्थी नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी पंडित ढमाले, गोविंद डुरे पाटील, आनंद पाटील, नांदगाव विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सतीश कुलकर्णी, सुधाकर ढमाले, बिरुदादा काळे, सुधाकर पाटील, रोहित पाटील, हरिबा कळबंडे, पंडित रिध्दीवाडे, पप्पू जगताप, वजीरसाहेब शेख तसेच आदी दिव्यांग, वृध्द, निराधार लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.