दयानंद कला महाविद्यालयातर्फे आर्थिक मदत

दयानंद कला महाविद्यालयातर्फे आर्थिक मदत

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने अनेक सामाजीक उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. संपूर्ण देशभर कोव्हीड -19 परिस्थीती असतांना कोरोना विषाणूच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी यांच्या प्रेरणेने व महाविहद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लातूर शहरातील सर्व पोलीस्टेशन, बँक कर्मचारी, पत्रकार, लातूर महानगर पालीकेतील सफाई कामगार यांना मोफत मास्क व सॅनीटाईजरचे वाटप करण्यात आले. आर्थीक दृष्टया कमजोर विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. सफाई कामगारांना हात धुण्याचे व मास्क वापरण्याचे प्रशिक्षण डॉ. संतोष पाटील यांनी दिले. मार्च महिन्यामध्ये डॉ. राहुल जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना कोरोनाच्या संदर्भात जनजागृती केली. या सर्व कार्याचा परिणाम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर पडला. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी आपल्या गावामध्ये आपआपल्या घरांमध्ये बंद खोली मध्ये न बसता त्यांनी गावामध्ये अँन्टी कोरोना फोर्स या उपक्रमात भाग घेतला. गावातील लोकांना आरोग्य आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यासाठी मदत केली. दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संस्कारामध्यून प्राणीमात्रावर व पशू पक्षांवर प्रेम करण्याची सवय भरत पवार या विद्यार्थ्यास जडली. या विद्यार्थ्यांने आपल्या शेतामध्ये पक्षांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था केली.

सौ. सुरेखा धम्मानंद सावंत गंगाखेड ह्या दयानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात मजुरीचे काम करण्यास आल्या त्यांची परिस्थिती व कौटूंबीक जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांना 4-मुली व 1 मुलगा त्यातील एक मुलगी दयानंद वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता 11वी वर्गात शिक्षण घेत आहे. मुलगा निवासी शाळेत आहे. त्यांच्या एका मुलीचा संपूर्ण खर्च दयानंद शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी राहण्याचा, जेवणाचा व शिक्षणाचा सोय केलेली आहे. हीच परंपरा कायम ठेवत दयानंद कला महाविद्यालयातील स्टाफच्यावतीने रु. 2000/- , दयानंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. संजय कुलकर्णी यांनी रु. 1000/- व डॉ. प्रशांत दिक्षीत यांनी रु. 1000/- असे एकुण 4000/- रु. ची तात्काळ गरज म्हणून मदत केली.

या त्याच्या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शिवजी गायकवाड यांनी गरजूंना वेळोवेळी मदत करण्यास दयानंद कला महाविद्यालय अग्रेसर आसते आणि येथील सर्व कर्मचारी मदतीसाठी सज्ज आसतात. याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे , डॉ. गोपाल बाहेती, प्रा. जिगाजी बुद्रूके, प्रा. ईरफान शेख, प्रा, सचिन पतंगे, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव आदी याप्रसंगी उपस्थित होते.

About The Author