सर्व स्मशानभूमी, दफनभूमी येथे पाण्याची सोय करा व स्वच्छता मोहीम राबवा

सर्व स्मशानभूमी, दफनभूमी येथे पाण्याची सोय करा व स्वच्छता मोहीम राबवा

राष्ट्रवादी अर्बन सेल ची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे व जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी अर्बन सेल व राष्ट्रवादी माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर यांना लातूर शहरातील सर्व स्मशानभूमी, दफनभूमी, विषेत: खाडगाव रोड स्मशानभूमी येथे पाण्याची सोय करावी व स्वच्छता मोहीम राबवावी अशा मागणी चे निवेदन लातूर शहर महानगर पालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना देण्यात आले.

या निवेदनाद्वारे खाडगाव रोड स्मशानभूमी येथे मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करण्यात येतात,अंत्यविधी करताना पाणी पाजण्याचा विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, शिवाय अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना हातपाय धुवण्यासाठीही पाण्याची आवश्यकता असते, परंतु खाडगाव रोड स्मशानभूमी येथे पाणी नसल्यामुळे मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.लातूर शहरातील पूर्व भागातील मारवाडी स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात राख, कचरा साचलेला असून तेथील साफ सफाई होणे आवश्यक आहे. तसेच याच मुलभुत सुविधा लातूर शहर महानगरपालिकेद्वारे नांदगाव येस, सिद्धेश्वर येस व सर्व समाजाच्या स्मशानभूमी/दफनभूमीत पाण्याची सोय करून तेथे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे आशी मागणी करण्यात आली.

About The Author