गजानन चिंचवडे यांचा मृत्यू हृदयविकारानेच – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
पिंपरी (प्रकाश इगवे) : गजानन चिंचवडे यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. चिंचवडे यांचा मृत्यू आत्महत्या नाही, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात जमिनीचा दिवाणी दावा असताना तो फौजदारी कसा केला, याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, चिंचवडे प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट यायचा आहे; पण त्यांच्या हृदयात ७० टक्के ब्लॉकेजेस असल्याने हा मृत्यू हृदयविकारानेच झाला असल्याचे स्पष्ट आहे. त्यात आत्महत्या वगैरे काही नाही. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पण दिवाणी दावा फौजदारी कसा केला, याबाबतची माहिती घेत आहोत. गजानन चिंचवडे यांना आदल्या रात्री कोणी कोणी मोबाइलवर संपर्क केला होता. याचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढायचे आदेश दिल्याचे कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले.