नूतन काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

नूतन काँग्रेस तालुका अध्यक्ष यांच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

काँग्रेस पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करावा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचना

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपंचायत निवडणुक, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषि उत्पन बाजार समिती, नगरपालिका, यांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी आतापासून कामाला लागावे व सर्वच ठिकाणीं कॉंग्रेसची पक्ष संघटनेची बांधणी करावी यासाठी जिल्हातील सर्व नूतन काँग्रेस तालुका अध्यक्ष यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.

ते आज सोमवारी लातूर येथे जिल्यातील नवनिर्वाचित तालुका काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीने आशियाना निवासस्थानी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे , जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, रेणा चे माजी चेअरमन आबासाहेब पाटील प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया सरचिटणीस हारिराम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष संभाजी सुळ, नूतन तालुका अध्यक्ष अँड प्रमोद जाधव (रेणापूर) विजयकुमार पाटिल (निलंगा) मारूती पांडे (जळकोट) दत्तोपंत सूर्यवंशी (औसा) अँड हेमंत पाटील (अहमदपूर) कल्याण पाटील,(उदगीर) आबासाहेब पाटील (शिरूर अनंतपाळ) गोविंद शिंगाडे (निलंगा शहर अध्यक्ष) यावेळी उपस्थित होते.

About The Author