सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल हारिराम कुलकर्णी यांचा सत्कार

सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल हारिराम कुलकर्णी यांचा सत्कार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सरचिटणीस पदावर लातूर येथील जिल्हा कॉंग्रेसचे मीडिया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा लातूर जिल्हा काँग्रेस च्या वतीने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस आर देशमुख, रेणा चे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील, निलंगा शहर काँग्रेस अध्यक्ष गोविंद शिंगाडे, औसा तालुका काँग्रेस अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, मारूती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव भोसले, ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी चांदपाशा इनामदार, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!