लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा – मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा - मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : देशात लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नवमतदारांनी आपल्या नावाची मतदार यादीत नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियेाजन समिती सभागृहात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुचिता शिंदे, प्रभारी तहसिलदार राजेश जाधव, नायब तहसिलदार हरीश काळे, श्री.देवणीकर उपस्थित होते.

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा - मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. लोकशाहीत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा सन्मान करुन प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार नोंदवावा.असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सखोल मार्गदर्शन करुन या लोकशाही प्रक्रियेतील मतदार यादीत नाव नोंदणी व जनजागृती करण्याच्या कामात प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले. या दरम्यान प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते नवमतदारांना ओळख पत्र वाटप, मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविण्यासाठी घेण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये वादविवाद, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतिय आलेल्या विजेत्यास प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ठ काम केलेले अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.यामध्ये नायब तहसिलदार श्री.देवणीकर यांच्यासह बीएलओ, डाटा इंन्ट्री ऑपरेटर, नोडल ऑफिसर यांचा समावेश आहे.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन राष्ट्रीय दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सर्वांना यावेळी शपथ घेतली. कार्यक्रमास जिल्हा निवडणूक, तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उध्दव फड यांनी केले तर आभार प्रभारी तहसिलदार राजेश जाधव यांनी मानले.

About The Author