रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सूचनेनुसार लातूर जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून त्यात रेणापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रमोद जाधव यांची निवड काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली असून त्याबद्दल रेणापूर तालुका काँग्रेस च्या वतीने सोमवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस आर देशमुख, रेणा चे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेस मिडिया अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, रेणा चे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, रेणा चे चेअरमन सर्जेराव मोरे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author