दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने खुनाचा प्रयत्न

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने खुनाचा प्रयत्न

पुणे (प्रकाश इगवे) : दारू पिण्यासाठी हजार रुपये मागितल्यानंतर पैसे न देता पळून जाणाऱ्याला चार जणांच्या टोळक्याने पाठलाग करून कोयते फेकून मारत खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. पोलीसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

केट्या ऊर्फ अमित थोपटे (३०), सूरज प्रभाकर झिटे (३०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अमोल थोपटे, गणेश मोडावत या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सौरभ दत्तू सरवदे (२२, रा. जनता वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!