रिलेशिपमध्ये रहा म्हणून दिली जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक

रिलेशिपमध्ये रहा म्हणून दिली जीवे मारण्याची धमकी; तरुणाला अटक

पिंपरी (रफिक शेख) : रिलेशनशिपमध्ये राहा, नाही तर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ ला दुपारी १ वाजणाच्या सुमारास वाकड येथे घडला. एका महिलेने गुरुवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अभिजीत मधुकर शिंगण (वय २८, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे रिलेशनशिपमध्ये राहा म्हणून मागे लागला होता. यावरून फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तरीही आरोपी फिर्यादी यांचा पाठलाग करीत होता. फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

About The Author

error: Content is protected !!