दुकानाचे शटर फोडून ९४ हजारांची चोरी

दुकानाचे शटर फोडून ९४ हजारांची चोरी

पिंपरी (प्रकाश इगवे) : दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईलची चोरी केली. चोरट्यांनी एकूण ९४ हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले. कुदळवाडी येथील रूद्र मोबाईल अॅन्ड गिफ्ट गॅलरी येथे बुधवारी, दि. ९ रोजी रात्री अकरा ते गुरुवार, दि. १० रोजी सकाळी साडेपाच या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी मनोज विठ्ठल हाके (वय २३, रा. गेअर कंट्रोल कंपनीसमोर, मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!