स्पोर्ट्स बाईकवरून आले; महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

स्पोर्ट्स बाईकवरून आले; महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

पिंपरी (प्रकाश इगवे) : अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक महिला तिच्या दोन मुलांसह दुचाकीवर थांबली होती. त्यावेळी स्पोर्ट्स बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याचा गोफ असा ५२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसकल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!