शिक्रापूरात चोरी; चार तोळे दागिन्यांसह रक्कम चोरांकडून लंपास

शिक्रापूरात चोरी; चार तोळे दागिन्यांसह रक्कम चोरांकडून लंपास

शिक्रापूर (रफिक शेख) : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे राहणाऱ्या महिलेच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे राहणारी रेखा गुप्ता ही महिला झोपलेली होती. पहाटेच्या सुमारास महिलेला जाग आली असताना तिला दरवाजा उघडा कपाट उघडलेले आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले.

About The Author

error: Content is protected !!