सीए परीक्षेत अपयश आल्याने २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

सीए परीक्षेत अपयश आल्याने २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या

पिंपरी : सीए परीक्षेत अपयश आल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने राहत्या घरी शुक्रवारी सकाळी केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी संजय जाधव (२४, रा. केशवनगर, चिंचवड) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सीएचा अभ्यास करीत होती. यापूर्वी दोन वेळा ही परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेला तिला अपयश आले. मागील वेळी तिने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. मात्र, या वेळीही अपयश आल्याने नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना नैराश्य आल्याने आत्महत्ये करण्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता सीए परीक्षेचा अभ्यास करणाऱ्याची घटना घडली.

About The Author

error: Content is protected !!