कपडे धुण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा तळ्यामध्ये बुडून मुलीचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा तळ्यामध्ये बुडून मुलीचा मृत्यू

वाघोली : वाघोली (ता. हवेली)-भावडी रोडलगत असणाऱ्या भैरवनाथ तळ्यामध्ये बहिणीसह कपडे धुण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलगी पाय घसरून तळ्यामध्ये पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) दुपारी ३ च्या सुमारास घडली. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाने तळ्यामध्ये तीन तास शोधकार्य करून मुलीचा मृतदेह बाहेर काढला.

सोनाक्षी विजय राखपसरे (रा. बुरुंजआळी, वाघोली) असे बुडून मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी व तिची बहीण संगीता या कपडे धुण्यासाठी भैरवनाथ तळ्यामध्ये गेल्या होत्या. बहीण कपडे धूत असताना. थोड्या अंतरावर पायऱ्यांच्या कोपऱ्याला गेलेली सोनाक्षी ही पाय घसरून तळ्यामध्ये पडली.

About The Author

error: Content is protected !!