एक लाख ४४ हजारांचा ऐवज घरफोडीत लंपास

एक लाख ४४ हजारांचा ऐवज घरफोडीत लंपास

पिंपरी (रफिक शेख) : अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घड्याळ, असा एकूण एक लाख ४४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. १२) रात्री बारा ते सकाळी सहा या कालावधीत ही घटना घडली. अशोक गणपत उत्तेकर (वय ५२, रा. शिवरामनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादीचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दोन मंगळसूत्र, कानातील सोन्याच्या दोन रिंगा, कानातील सोन्याचे टॉप्स, एक सोन्याची ठुशी, एक घड्याळ, सात हजार रोख रक्कम, असा एकूण एक लाख ४४ हजारांचा ऐवज चोरून नेला.

About The Author

error: Content is protected !!