गोळीबार करणार्‍या चोरट्याला जीवाची पर्वा न करता पोलिसने पकडले

गोळीबार करणार्‍या चोरट्याला जीवाची पर्वा न करता पोलिसने पकडले

पुणे (रफिक शेख) : कोंढव्यातील सराफी दुकानात शिरून गोळीबार करून पळून जाणाऱ्या चोरट्याच्या हातात पिस्तूल असतानाही एका पोलीस अंमलदाराने धाडसाने झडप घालून त्याला पकडले. पोलीस अंमलदार अंकुश केंगले असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या सौद असिफ सय्यद (रा. फैजाना मस्जिदजवळ, मिठानगर, कोंढवा) याला अटक केली आहे. ही घटना कोंढव्यातील आंबेडकर नगरमधील अरिहंत ज्वेलर्समध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.

याप्रकरणी मुकेश ताराचंद गुगलिया (वय ५०, रा. सनफ्लॉवर सोसायटी, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलिया यांचे कोंढव्यातील आंबेडकरनगर येथे अरिहंत ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा कामगार शुभम हे दुकानात बसले होते. रात्री दुचाकीवरून सौद सय्यद व रुहान खान हे दोघे आले. त्यांनी दुकानदाराला बाहेर पडता येऊ नये, म्हणून दुकानाचे शटर बंद केले आणि गुगलिया यांच्याकडे पैसे व सोने काढून देण्याची मागणी करू लागले, गुगलिया यांनी ते न दिल्याने त्याने त्याच्याकडील पिस्तुलामधून एक गोळी झाडली. या गोळीचा आवाज ऐकून दुकानाबाहेर गर्दी जमली. तेव्हा दोघेही चोरटे आरडाओरडा करीत व पिस्तुलाचा धाक दाखवून पळून जाऊ. लागले. त्याच वेळी पोलीस अंमलदार अंकुश केंगले हे गस्त घालत तेथे येत होते. दुकानापासून सुमारे १०० मीटर अंतरावर चोरटे पळून चालले होते. अंकुश केंगले यांच्यासमोर सौध हा पिस्तूल घेऊन येत होता. तरीही न डगमगता त्यांनी झडप घालून त्याला पकडले. या गडबडीत त्याचा साथीदार पळून गेला.

About The Author

error: Content is protected !!