देहविक्रय करणाऱ्या महिलेवर ब्लेडने वार
पुणे (प्रकाश इगवे) : वेश्यावस्तीत देहविक्रय करणाऱ्या महिलेवर एकाने ब्लेडने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत ३५ वर्षांची महिला जखमी झाली आहे. बुधवार पेठेतील राहत्या घरासमोर ही महिला शुक्रवारी रात्री थांबली होती. त्यावेळी आरोपी सिद्धलिंगप्पा आणि भोईचा किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद त्या वादातून आरोपीने त्याच्याकडील ब्लेडने तिच्यावर वार केले. त्यावेळी परिसरातील सजग नागरिकांनी पकडून त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या महिलेल्या नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
