तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक

तरुणावर जीवघेणा हल्ला; आरोपीला अटक

पुणे (रफिक शेख) : दत्तवाडी परिसरातील तरुणावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. साथीदारांच्या मदतीने त्याने तरुणावर जीवघेणा हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले आहे. गणेश रामलू मोडावत (वय २९, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तरुणावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपी के.के. मार्केट परिसरात थांबल्याची माहिती हवालदार नीलेश शिवतरे आणि अमदलार सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश मोडावत याला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, नीलेश शिवतरे, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, धनंजय ताजणे, तेजाराणी डोंगरे यांनी केली.

About The Author

error: Content is protected !!