पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे (प्रकाश इगवे) : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा फरार आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना जानेवारीत घडली. गोपी वेताळ व पप्पू कांबळे (दोघेही रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी सूरज दिगंबर शेजवळ (वय २७, रा. जांभूळवाडी रोड) याची गोपी वेताळ व पप्पू कांबळे यांच्याबरोबर पूर्वी भांडणे झाली. १३ जानेवारीला सूरज शेजवळ सिद्धिविनायक सोसायटीच्या पार्किंगमध्ये असताना दोघा आरोपींनी भांडणाचा राग मनात धरून कोयत्याने वार केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपी फरार झाले होते. आरोपी हे स्वामी नारायण भागाल पडीक बंगल्यात लपल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांना मिळाली होती.

About The Author

error: Content is protected !!