जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

पुणे (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील भावडी, कारेगाव, थुगाव, कुरवंडी या चार गावामध्ये वसुंधरा संवर्धन, द क्लायमेट रिॲलिटी, मॅप्स इंडस्ट्रीज प्रा लिमिटेड पुणे यांच्या सहयोगाने व आय सी आय सी बँकेच्या सी एस आर फंडातून जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा भावडी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा संवर्धनचे संस्थापक रवींद्र निंबाळकर व कर्नल शशिकांत दळवी होते

पोलिस फ्लॅश न्युजचे सहसंपादक वसुंधरा संवर्धनचे सदस्य केशव नवले यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव तालुक्यातील या चारही गावातील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेमुळे जमिनीत जाणार आहे त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याकामामुळे उन्हाळ्यातील महिन्यात रोजच्या गरजासाठी पाणी मिळणार व टँकरवर अवलंबून असणारी गावे जलयुक्त होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही गावे जल आत्मनिर्भर झाली आहे, अशा भावना गावातील गावकरी व उपस्थित लोकांनी व्यक्त केल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिवसेनेचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ ताराचंद कराळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी द क्लायमेट रिॲलिटी चे आदित्य पुंडिर, मॅप्स इंडस्ट्रीजचे अनिरूद्ध तोडकर, आय सी आय सी आय बँकेचे जयसिंग धुमाळ, कोलको जोअँचीम, वसुंधरा संवर्धनचे उपाधक्ष्य कुलकर्णी, सचिव योगेश शितोळे, सदस्य प्रज्ञा शिंदे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, सदस्य शीतल तोडकर, अशोकशेठ बाजारे, सोपानराव नवले,
चारही गावाचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कातळे, प्रास्तविक सरपंच महेश नवले व आभार भावडी गावचे पाटील, गावपोलिस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याधक्ष्य गोरक्षनाथ नवले यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!