शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान स्मारकासाठी नियोजित जागेच्या अनावरण सोहळा संपन्न।

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान स्मारकासाठी नियोजित जागेच्या अनावरण सोहळा संपन्न।

अहमदपूर (गोविंद काळे) : शहीद टिपू सुलतान प्रतिष्ठानच्या मागणीवरून नगर परिषद अहमदपूरने वेळोवेळी अनेक ठराव सर्वानुमते मंजूर करून शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांच्या स्मारक उभारणीसाठी सर्वे नं. 39 आरक्षण क्र. 38A नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांच्या स्मारक उभारणी करिता टिपू सुलतान प्रतिष्ठानला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. दि 12 फेब्रुवारी (शनिवार) रोजी शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान स्मारकासाठी नियोजित जागेच्या नामफलकाच्या अनावरण सोहळा स्थानिक आमदार मा.बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होणार होते परंतु अचानक आमदार साहेबांच्या तब्यतीत बिगाड झाल्याने सदरील नामफलकाचे अनावरण माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ.अश्विनीताई लक्ष्मीकांत कासनाळे होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख तर कार्यक्रमाला प्रमुख प्रवक्ते म्हणून इतिहास संशोधक सरफराज अहेमद हे उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख व्याख्याते सरफराज अहमद यांनी देशात विविध ठिकाणी शहीद टिपू सुलतान विषयी होत असलेल्या अप-प्रचाराचा निषेध व्यक्त करून म्हणाले कि, इतिहासकार ज्या किरमानीने लिहलेल्या पुस्तकाचे संदर्भ देतात त्या किरमानीला रियासत विरोधात गद्दारी केल्याचे आढळून आल्या नंतर हैदर अली व टिपू सुलतान यांनी दरबारातुन बडतर्फ केले होते.त्याच किरमानीला टिपू सुलतान शहीद झाल्यानंतर अंग्रेज़ांनी पेन्शन व माफी देण्याचे अमिष दाखवून टिपू सुलतान विरोधात खोट्या कथा रचून पुस्तक लिहिन्यात लावले असे सरफराज अहमद यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमात कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, कृषि. उ. बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल मुजीब पटेल जहागीरदार, कांग्रेस अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सिरजोद्दीन जागीरदार, मोहसीन बायझीत, कांग्रेस तालुका अध्यक्ष ऍड. हेमंत पाटील, मुफ्ती फाजील कासमी, प्रा.अकबर लाला, महेश बँकचे उपाध्यक्ष निवर्ती कांबळे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खांडेकर, मोहिब कादरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर बागवान, राष्ट्रवादीचे इलियास सय्यद, जेष्ठ वकील टी. एन. कांबळे, उत्तम माने, नगरसेविका नळेगांवकर ताई, नगरसेवक बाळू कासनाळे, नगरसेवक मुन्ना सय्यद, नगरसेवक अभय मिरकले, नगरसेवक रवी महाजन, नगरसेवक अलीम सय्यद, नगरसेवक भैय्या भाई, बाळू आगलावे पाटील, सुनील डावरे, प्रकाश ससाणे, अशोक सोनकांबळे, व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक शहीद टिपू सुलतान प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलम मोहम्मद शेख, रहीमखान पठाण, जावेद इसाक बागवान, अय्याज शेख, मुझम्मील हाश्मी, अफरोज पठाण, साबेर शेख, अफरोज शेख, इमरोज पटवेगर, हसन सय्यद, मासुम शेख, इरफान शेख व इतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेर-ए-हिंद शहीद टिपू सुलतान यांच्या स्मारकासाठी जागेच्या नियोजन करून दिल्या बद्दल अहमदपूर नगर परिषदेचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा,सर्व सदस्य मुख्याधिकारी तथा सर्व कर्मचाऱ्यांचे आभार शहीद टिपू सुलतान प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलम मोहम्मद शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात मानले.या वेळेस औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष डाॅ अफसर शेख, डाॅ.फुज़ेल जागीरदार,रहीमखान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचलन ऍड.अनवर सय्यद यांनी व आभार अय्याज शेख यांनी मानले।

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!