माता रमाई आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयत्तीनिमीत्त सर्व रोगनिदान शिबिर संपन्न

माता रमाई आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयत्तीनिमीत्त सर्व रोगनिदान शिबिर संपन्न

बहिष्कृत हितकारणी संघर्ष समिती व व्हिजन हॉस्पिटल चा संयुक्त पुढाकार

लातूर (प्रतिनिधी) – दि.13 फेब्रुवारी रोजी बहिष्कृत हितकारणी संघर्ष समिती व व्हिजन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोगनिदान शिबीर सम्राट चौक वडार भवन येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून विवेकानंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर साहेब व डॉ विजय अजनिकर साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवजी महाराज, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मण शिंदे, तर सदरील कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यात ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला ते आकाश हुलगुंडे, सूरज शिंदे, बालाजी हुलगुंडे, राजू हुलगुंडे, अर्जुन शिंदे, अमोल शिंदे, रोहन धावारे, रोहन हुलगुंडे, दुर्गेश बामस्कर या कार्यक्रमाचे संयोजक निलेश सिरसाट, निखील गायकवाड, भैय्या वाघमारे, अक्षय धावारे, महेश गुंड, निलेश कांबळे, बबलू गवळी, सतीश करंडे, बाबा ढगे, डी उमाकांत, आकाश ढगे, या वेळी बहिष्कृत हितकारणी संघर्ष समिती मार्फत व्हिजन हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ चे खूप खूप आभार मानले या शिबिराचा विविध आजारावर दोन शे तेवीस नागरिकांनी लाभ घेतला.

About The Author