रोजगारासाठी अॅनिमेशन व्हि.एफ.एक्स पदवी अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय – प्रा.दुर्गा शर्मा
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयाच्या अॅनिमेशन विभागातर्फे अॅनिमेशन मधील करीअर च्या संधी या विषयावर दि.14 फेब्रुवारी रोजी सेमीनार घेण्यात आला सध्या अॅनिमेशन सारख्या करीअर बद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण ज्ञान असणे व यातील असणा-या रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी अशा कार्यक्रमांची आखणी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.लक्ष्मीरमणजी लाहोटी व दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रमेशजी बियाणी यांच्या प्रेरणेने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना म्हणाले कि आत्ताची पिढी जे सिनेमे पाहते ते अॅनिमेशन आणि व्ही.एफ.एक्स या केलेशिवाय साकारणे अश्यक्य आहे. विद्यार्थ्यांनी आजच्या सेमिनारचा लाभ घ्यावा व ह्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यावे. असे आव्हान त्यांनी केले त्याच बरोबर या पदवी साठी लागणारे शुल्क कश्या रित्या भरू शकतो यावरही प्रकाश टाकला या वेळी दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी हे बोलताना म्हणाले अश्या करीअर बद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेणे आवश्यक आहे. जेणे करून पारंपारिक शिक्षणसोबत अशा पदवी अभ्यासक्रमाकडे डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होईल या कार्यक्रमामध्ये दृकश्राव्य माध्यमातून अनेक अॅनिमेटेड व्हिडीओ आणि सिनेमा च्या व्ही.एफ.एक्स मेकिंग दाखवुन अॅनिमेशन विभाग प्रमुख प्राध्यापक दुर्गा शर्मा यांनी अॅनिमेशन मधील करीअर च्या संधी समजावुन सांगितल्या त्याच बरोबर अॅनिमेशन ची पाईपलाईन शिकविले जाणारे विशय आत्तापर्यंत अॅनिमेशन मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यकिरदीमध्ये संपादन केलेले यश विद्यार्थ्यांसमोर मांडले. अॅनिमेशन हे क्षेत्र मनोरंजनावर आधारित आहे. कोरोना काळात जेंव्हा सिनेमा सिनेमा गृहात प्रदर्शित होणे बंद झाले होते तरी आपण मनोरंजनासाठी अनेक दुसरे माध्यम शोधले जसे की अनेक ओ.टि.टि. माध्यमांनी डोके वर काढले आणि अनेक वेब सिरीज द्वारे आपण आपली मनोरंजनाची गरज भागवली म्हणून असे दिसून येते की कितीही बिकट परीस्थिती आली तरी आपण मनोरंजनाची गरज भागवुन घेतो. मनोरंजनाला कधीच अंत नाही त्याच प्रकारे अॅनिमेशन क्षेत्रालाही अंत नाही. त्यामुळे असे करीअर विद्यार्थ्यांनी निवडणे खुप गरजेचे आहे. जेणे करून बरोजगारीची झळ त्यांच्या पर्यंत पोहचनार नाही. पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती असून त्यानी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या काय्रक्रमाचे सुत्र संचालन प्रा. संतोष काकडे तर आभार सचिन पतंगे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.इरफान शेख व प्राध्यापक पुजा खोंडे यांनी प्रयत्न केले. मोठया संख्येन विद्यार्थी या सेमिनार साठी उपस्थित होते. याच प्रमाणे दयानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयामध्ये आणि दयानंद कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालयामध्ये अशा सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते.