महात्मा फुले महाविद्यालयात आर.के. देशमुख यांना श्रद्धांजली

महात्मा फुले महाविद्यालयात आर.के. देशमुख यांना श्रद्धांजली

अहमदपूर : येथील महात्मा फुले महाविद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सहसचिव तथा थोर प्रवचनकार आर. के. देशमुख यांचे वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आर. के. देशमुख हे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे ज्येष्ठ सद्स्य होते . प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतीश ससाणे, डॉ.पांडुरंग चिलगर, डॉ. संतोष पाटील, डॉ. प्रशांत बिरादार, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत धुमाळे, अजय मुरमुरे , शिवाजी चोपडे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी ‘कोविड- १९’ चे नियम पाळून उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!