दिशा प्रतिष्ठान च्या ‘फिरता दवाखाना’ मुळे रुग्णांना मिळतेय ‘योग्य दिशा’

दिशा प्रतिष्ठान च्या 'फिरता दवाखाना' मुळे रुग्णांना मिळतेय 'योग्य दिशा'

रोहित पाटील मित्र मंडळाचा पुढाकार;  शिबीरास उदंड प्रतिसाद

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नांदगाव येथे दि. 14 फेब्रुवारी वार सोमवार रोजी सकाळी 11 वा. च्या सुमारास नांदगाव येथील रोहित पाटील मित्र मंडळाच्या पुढाकारातून दिशा प्रतिष्ठान च्या फिरता दवाखाना या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दिशा प्रतिष्ठान च्या ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या बाबतीत ‘योग्य दिशा’ मिळत आहे. या शिबीरामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गरजू रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध, गोळ्या देण्यात येत आहेत. या फिरता दवाखाना मुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात सवलती च्या दरात घरपोच लाभ मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. नांदगांव येथे घेण्यात आलेल्या दिशा प्रतिष्ठान च्या फिरता दवाखाना या शिबीराचा ग्रामस्थांनी, रुग्णांनी मोठ्या संख्येने आरोग्य सेवेचा लाभ घेत उदंड प्रतिसाद दिला.

दिशा प्रतिष्ठान च्या 'फिरता दवाखाना' मुळे रुग्णांना मिळतेय 'योग्य दिशा'

दिशा प्रतिष्ठान चे मार्गदर्शन अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सोनू डगवाले, उपाध्यक्ष दिनेश गोजमगुंडे, सचिव जब्बार पठाण, प्रकल्प समन्वयक वैशाली लोंढे यादव, प्रकल्प प्रमुख इसरार सगरे यांच्या फिरता दवाखाना या सामाजिक उपक्रम शिबीरामुळे सर्वसामान्य गरजू रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामस्थांनी दिशा प्रतिष्ठान चे आभार व्यक्त केले आहे.


यावेळी शिबीर यशस्वी करण्यासाठी आनंद पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, विश्वजीत पाटील, नितीन ढमाले, नागनाथ साळुंके, रोहित पाटील, अमजद पठाण, आपा सातपुते, निलेश शिंदे, सुयश जगताप, श्रीपाल वाघमारे, कैलास जगताप, योगेश सातपुते, रवि धबडगे, रकेश कुसभागे, महादेव काळुंके, अच्युत उदारे व रोहित पाटील मित्र मंडळाचे इतर पदाधिकारी आदीनी परिश्रम घेतले.

About The Author