विक्रीसाठी आणलेला एक किलो गांजा जप्त

पिंपरी : विक्रीसाठी आणलेला २६ हजार ३२५ रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. १४) दुपारी अडीचच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे ही कारवाई केली.
लहानू निवृत्ती केदार (वय ३५, रा.जाधववस्ती, बावधन बुद्रुक), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राजू सोनवणे (रा. खडकवासला) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी सदानंद रुद्राक्षे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केदार याने आरोपी सोनवणे याच्याकडून गांजा विकत आणला. याबाबत माहिती मिळाली.