ऑनलाइन विक्रीत तरुणाला गंडा
पुणे : गृहोपयोगी साहित्य खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका डॉक्टर तरुणाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २४ वर्षांच्या एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली. तरुणाने वातानुकूलन यंत्र, बेड विक्रीची जाहिरात संकेतस्थळावर दिली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. खरेदीसाठी चोरट्यांनी त्यांना क्यूआर कोड पाठविला. कोड स्कॅन करण्यास सांगितले. कोड स्कॅन केल्यानंतर ऑनलाइन पैसे खात्यात जमा करतो, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती चोरली. या माहितीच्या आधारे चोरट्यांनी पैसे लांबविले.