अश्लील फोटो व्हायरल; कर्जदाराची आत्महत्या
पुणे : आईने घेतलेले केवळ ८ हजाराचे कर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने अश्लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज व्हायरल केल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेसेज व्हायरल करणारी फायनान्स कंपनी व त्यातील कर्मचाऱ्यांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुग्रह ए. पी. प्रकाशन (वय २२, रा. माणिकबाग, मूळ रा. केरळ) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी • नाईजिल राजन मटानकोट (वय ३१, रा. औंध) यांनी फिर्याद दिली. हा प्रकार • सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे २६
ते २७ जानेवारीदरम्यान प्रकार घडला. फायनान्स कंपनीतून प्रकाशन यांना फोन आला व तुमच्या आईने ८ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते भरले नाही. तसेच मुद्दल परत करण्यात आली नाही, असे सांगत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर फायनान्स कंपनीतील एका कर्मचाऱ्याने प्रकाशन यांचे अश्लील फोटो व शिवीगाळ असलेले मेसेज त्यांचे नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांना पाठवून व्हायरल केले. त्यामुळे बदनामी झाल्यामुळे प्रकाशन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी प्रकाशन यांच्यावर केरळला अत्यंसंस्कार केल्यानंतर फिर्याद दिली.