दारूसाठी वाद; माय-लेकावर वार
पुणे : दारू पित असताना वादातून झाला. त्यातून टोळक्याने तरुणासह त्याच्या आईवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आकाश कांबळे, अनिकेत कांबळे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे. सोमनाथ जगदाळे (वय २४) आणि सरस्वती जगदाळे (दोघे रा. आंबेगाव बुद्रुक) हे जखमी झाले आहेत. ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील समर्थ इमारतीजवळ शुक्रवारी रात्री घडली. सोमनाथ आणि आकाश ओळखीचे असून, ११ फेब्रुवारी रोजी रात्री ते मित्रांसोबत दारू पित होते. त्यावेळी झालेल्या वादातून त्यांनी सोमनाथ व त्याच्या आईलला मारहाण केली.