पोलिसाची कॉलर पकडून दमदाटी
राजगुरूनगर : पोलीस आमचे घरचे नोकर आहेत. तुमच्या सर्वांचा हिशेब चुकता करतो, असा दम देऊन पोलीस हवालदाराची कॉलर पकडून शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश मदन भोर (वय २२, रा. मूळ रा. वांजाळे ता. खेड, सध्या रा. शिरोली ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार निखिल कैलास मोरमारे यांनी फिर्याद दिली आहे. वाडा (ता. खेड) येथील बार सागर शुभम येथे पोलीस हवालदार मोरमारे व होमगार्ड पेट्रोलिंग करत जात असताना दरम्यान तेथे तीन जणांमध्ये भांडणे सुरू होती. पोलीस हवालदार मोरमारे यांनी सांगितले की, भांडणे करू नका, यांचा गणेश भोर याला राग येऊन मोरमारे यांची कॉलर धरून तुम्ही कोण पोलीस, आमचे घरचे तुम्ही नोकर आहेत.