चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले

चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले

पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले. मावळ तालुक्यातील इंदोरी येथे रविवारी (दि.१३) मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

चंद्रभान नामदेव बिराजदार (वय २७, रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, मूळ रा. हुमनाबाद, जि. बीदर) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत.

त्यांच्या ट्रकचा रविवारी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास इंदोरी येथे किरकोळ अपघात झाला. त्यामुळे ते ट्रकमधून खाली उतरून टॉर्चने ट्रकची पाहणी करीत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून अनोळखी तीन जण तेथे आले. त्यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर जबरदस्तीने फिर्यादीचा पाच हजारांचा मोबाइल फोन आणि आठ हजार रुपये रोख काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण तपास करीत आहेत.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!