तुझ्यापाय ५ वर्षे दिली, तू माझी झाली पाहिजेस, मायलेकीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

तुझ्यापाय ५ वर्षे दिली, तू माझी झाली पाहिजेस, मायलेकीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

पिंपरी : तुझ्यासाठी पाच वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस, असे म्हणून मायलेकीचा विनयभंग केला. तसेच अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. चिंचवड येथे २०१८ पासून १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

चरणदास महादेव खडसे (वय ४५, रा. दत्तनगर, चिंचवड), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलीकडे पाहून आरोपी हा अश्लील वर्तन करत होता.

हा प्रकार वारंवार होत असल्याने फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय आरोपीकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा

गुन्हा दाखल करण्याची आरोपीने धमकी दिली. आरोपीने रविवारी (दि. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी महिलेला धमकी दिली. तू रो माझी नाही झालीस तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही, असे म्हणून तुम् धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे तपास करीत आहेत.

About The Author