रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

रंगकाम करताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू

पुणे (प्रकाश इंगवे) : इमारतीच्या बाहेरील बाजूस रंग देताना तोल जाऊन पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. धनकवडीतील बालाजीनगर परिसरात सोमवारी ही घटना घडली. सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. सुरेश पवार (वय ४३, रा. सुरेश बिल्डींग, के. के. मार्केटजवळ, बालाजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ज्ञानेश्वर एरंडे, रवींद्र ढमाळ, सुधाकर मनसुख, अशोक तांबोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत संगीता लक्ष्मण पवार यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांचा मुलंगा सुरेश हे रंगकाम करतात. बालाजीनगरमधील पंचशील इमारतीस रंग देण्याचे काम त्यांना दिले होते. सोमवारी पवार इमारतीस बाहेरून रंग देत होता, त्यावेळी तोल जाऊन पडल्याने पवार गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक उमेश लोंढे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

About The Author